
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (पीएमआरबीपी) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15.08.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in येथे 01.04.2025 रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना (बालक) हे पुरस्कार दिले जातात.
5 वर्षांपुढील आणि 18 वर्षांपर्यंत (31 जुलै 2025 रोजी) वयाचे कोणतेही बालक, जे भारतीय नागरिक आहे आणि भारतात राहत आहे, ते या पुरस्कारासाठी पात्र आहे.
कोणत्याही नागरिकाकडून नामांकने केवळ https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे प्राप्त केली जातील. पुरस्कारांसाठी केवळ ऑनलाईन माध्यमातून केलेले स्व-नामांकन आणि शिफारशी दोन्ही विचारात घेतले जाईल. अधिक माहितीसाठी, कृपया पुढील राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या: https://awards.gov.in.