प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

प्रत्येक व्यक्तीला निरोगी  आयुष्य जगण्यासाठी चांगल्या आहाराची आवश्यकता असते.सुरक्षित अन्न व औषध प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज आहे.विभागात  १९४ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदभरती झाल्याने या विभागातील  कामकाज अधिक गतीने होईल असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.

‘जागतिक अन्न सुरक्षा दिन- २०२५’ या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार कालिदास कोळंबकर, सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, आहारतज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित,पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर उपस्थित होते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *