
Picture Shows: Cherry Healey & Booby Seagull Ep 1
सोनी BBC अर्थ प्रेक्षकांना अभ्यासपूर्ण आणि साहसी जुलैचा आनंद घेण्यासाठी आवाहन करत आहे. या महिन्यात ‘इन्साइड द फॅक्टरी’ च्या सीझन 9 मध्ये दैनंदिन उत्पादनांच्या मागील अद्भुत प्रक्रिया कशा असतात हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’ सह प्रेक्षक धमाल आणि डोळे उघडणाऱ्या जागतिक प्रवासाचा आनंद घेतील. ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ या संकलनासह ही वाहिनी काही चित्तथरारक मोहिमांचा प्रवास सादर करणार आहे.
‘इन्साइड द फॅक्टरी’ चा सीझन 9 14 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. यामध्ये युरोपच्या काही प्रचंड मोठ्या फॅक्टरीज आतून बघता येतील. तेथील इनोव्हेशन, कौशल्य आणि लोकप्रिय पदार्थ किंवा वस्तूंच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी लागणारी मशीनरी पाहता येईल. पॅडी मॅकगिनेस या नवीन सादरकर्त्यासोबत ही मालिका फॅक्टरी फ्लोरच्या पलीकडे जाते आणि इतिहासकार रूथ गुडमनसोबत उत्पादनांचे जबरदस्त मूळ आणि त्यांच्या मागील यशोगाथा शोधते. चेरी हीली चीज कर्ल्स, चॉकलेट सीशेल्स, फ्लॅपजॅक्स आणि हार्डबॅक पुस्तकांच्या मागच्या शास्त्राचा शोध घेताना दिसेल. गोष्टी कशा बनवल्या जातात यांचे छुपे विश्व आतून बघण्यासाठी हा नवीन सीझन प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे.
यानंतर, 28 जुलै 2025 रोजी ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’चा प्रारंभ होत आहे. या मालिकेत कॉमेडीयन रोमेश रंगनाथन प्रेक्षकांना जगातील काही अनपेक्षित पर्यटन स्थानांवर घेऊन जाण्याचे धाडस करताना दिसेल. ही ठिकाणे आहेत, हैती, इथियोपिया, अल्बेनिया आणि आर्क्टिक. स्थानिक लोकांचे मार्गदर्शन घेत रोमेश तेथील उप-संस्कृती, विशिष्ट खाद्य पदार्थ यांचा शोध घेईल आणि जितकी म्हटली जातात तितकी ही स्थाने खरोखर आव्हानात्मक आहेत का, तेथील सौंदर्य आणि मोहकता चकित करणारी आहे का याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रम हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत सादर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना अपारंपरिक प्रवासानुभवावर विचार करण्यास प्रेरित करतो.
रोमेशच्या धाडसी कारनाम्यांसोबत सोनी BBC अर्थ 14 जुलै 2025 पासून ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ हे सुंदर पर्यटनाचे एपिसोड असलेले खास संकलन देखील सादर करणार आहे. या विशिष्ट संकलनात प्रेक्षकांना विख्यात सादरकर्त्यांसोबत जगातील काही वैविध्यपूर्ण प्रदेश आणि संस्कृती यांचा शोध घेण्यास आमंत्रित करण्यात येत आहे. यामध्ये ज्या मोहिमांचा समावेश आहे, त्यामध्ये अॅलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग सोबत केलेला आईसलँडचा प्रवास, जोआना लम्लीसोबत प्राचीन सिल्क रोडचा प्रवास, सू पर्किन्ससोबत गजबजलेल्या जपानचा प्रवास, दक्षिण कोरियाबाबत माहिती आणि सायमन रीव्हसोबत गंगा आणि श्रीलंकेचा अद्भुत प्रवास सामील आहे. या विशेष कार्यक्रमांमधून अप्रतिम दृश्य अनुभव मिळेल आणि कुशल शोधकांच्या दृष्टिकोनातून आपल्या ग्रहावरील सौंदर्य आणि विविधता साजरी होईल.
त्यामुळे या जुलैमध्ये सोनी BBC अर्थ आवर्जून बघा. ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ आणि ‘इन्साइड द फॅक्टरी’ हे कार्यक्रम 14 जुलैपासून अनुक्रमे रात्री 10:00 आणि रात्री 11:00 वाजता सादर होणार आहेत, तर ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’ 28 जुलैपासून रात्री 10:00 वाजता सादर होणार आहे.